Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळे: बनावट देशी-विदेशी दारू कारखान्यावर भरारी पथकाची धडक कारवाई, ₹2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त

 धुळे: बनावट देशी-विदेशी दारू कारखान्यावर भरारी पथकाची धडक कारवाई, ₹2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त



धुळे : MJW न्यूज मराठी 


धुळे, 19 सप्टेंबर 2026 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धुळे तालुक्यातील तिखी येथील बंद पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ₹2,59,780 किमतीचा बनावट दारू व निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र कारवाईच्या वेळी संशयीत आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे.


राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त यू.आर. वर्मा आणि अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


अशी झाली कारवाई

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, तिखी शिवारातील पत्री शेड येथील बंद पोल्ट्री फार्ममध्ये अवैधरित्या बनावट दारू निर्मिती करून ती खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक डी.जी. गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 19/09/2026 रोजी छापा टाकला.


छाप्यादरम्यान ठिकाणी बनावट देशी-विदेशी दारू, तयार विदेशी ब्लेंड व दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. एकूण ₹2,59,780 किमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


कारवाई करणारे अधिकारी

ही कारवाई डी.जी. गवळी दुसरे निरीक्षक, एस.एम. मोरे दुसरे निरीक्षक, मनोज धुळेकर, मयूर मोरे, कल्पेश शेलार आणि एन.डी. मोरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास डी.जी. गवळी करत आहेत.


जनतेला आवाहन

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, अवैध मध्य निर्मिती, विक्री व वाहतूक संबंधित कोणतीही माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 8002339999 किंवा व्हॉट्सअप 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल.

     

      MJW न्यूज मराठी 

खऱ्या बातमीचा खरा आवाज 


#DhuleNews #BanavatDaru #RajyaUtpadanShulk #MJWNewsMarathi #BreakingNews

Post a Comment

0 Comments