Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

खार पोलिसांची मोठी कारवाई | 3.9 लाखांचा चोरीचा माल हस्तगत, नाशिकमधून 3 आरोपी जेरबंद

 MJW न्यूज मराठी | सत्याचा शोध, जनतेचा आवाज



खार पोलिसांची मोठी कारवाई | 3.9 लाखांचा चोरीचा माल हस्तगत, नाशिकमधून 3 आरोपी जेरबंद


मुंबई: खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कपडे चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करत नाशिक येथून 3 आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून 3 लाख 90 हजार रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.


दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी खार पश्चिम येथील शुभ्रा अपार्टमेंटमधील शॉप क्र. 2 मध्ये कपडे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या 3 जणांनी दुकानदार श्री. राजेश नरसी पटेल यांच्या दुकानातील कपडे चोरून नेले होते. चोरी करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता.


मात्र खार पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी नाशिकच्या कुरेशी नगर परिसरात लपून बसले असल्याची माहिती मिळताच दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले.


पोलिसांनी आरोपींकडून शर्ट, पॅन्ट, स्वेटर, जिन्स पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट असे एकूण 240 नग कपडे जप्त केले. या मालाची एकूण किंमत ₹3,90,000/- आहे. खार पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. 1629/2026 व 1735/2026 मधील चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता 100% हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.


तपासादरम्यान या आरोपींचा वडाळा व आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशाच प्रकारच्या कपडे चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचेही निष्पन्न झाले आहे.


ही कारवाई मा. डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपआयुक्त, पश्चिम परिमंडळ व मा. संतोष काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश चौधरी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

Post a Comment

0 Comments