उभंड गावच्या महिला सरपंचाला 3 वर्षात 5 वेळा बडतर्फी!
माजी आमदार अनिल गोटेंचा मंत्री जयकुमार रावल यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप.
साक्रीतील महिला सरपंचाच्या छळवणुकीप्रकरणी अनिल गोटेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
MJW न्यूज मराठी
धुळे | 02 ऑक्टोबर 2026
शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील उभंड गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ. मोनाली योगेश पाटील यांच्या कथित छळवणुकीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावून पत्र लिहिले आहे. पत्र क्र. 72/2026
गोटे यांनी पत्रात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांना विरोध केल्यामुळे सरपंच मोनाली पाटील आणि त्यांचे पती योगेश पाटील यांना गेल्या 3 वर्षात 5 वेळा बेकायदेशीरपणे बडतर्फ करण्यात आले.
"पालकमंत्र्यांची दादागिरी आणि हुकूमशाहीचा निषेध" करत गोटे यांनी पुढे म्हटले की, विभागीय आयुक्तांनी दोन वेळा या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही 23 सप्टेंबर 2026 रोजी स्थगिती दिली. तरीही प्रशासनाकडून छळवणूक सुरूच आहे.
"धुळे जिल्ह्याचे जिल्हा पातळीवरील अधिकारी हे रावलांच्या गडीवरील फरशी पुसायचे काम करतात का? का झाडू पोचा मारायचे काम करतात?" असा खडा सवाल गोटे यांनी केला आहे.
महिलांनी राजकारणात यावे यासाठी सरकार प्रयत्न करत असताना, भाजपात आलेल्या महिलांची अशी फसवणूक होत असेल तर ते धक्कादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी गोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
MJW न्यूज मराठी
सत्याचा शोध, जनतेचा आवाज


Post a Comment
0 Comments