Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळे शहरातील घटनेचा आमदार अनुप अग्रवालांकडून तीव्र निषेध; 6 तारखेला मोठ्या मोर्चाचा इशारा

 धुळे शहरातील घटनेचा आमदार अनुप अग्रवालांकडून तीव्र निषेध; 6 तारखेला मोठ्या मोर्चाचा इशारा



MJW न्यूज मराठी

धुळे | 02 ऑक्टोबर 2026


धुळे शहरात आज घडलेल्या घटनेबाबत धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका भगिनीवर अतिप्रसंग केल्याचा हा लाजिरवाणा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


आमदार अग्रवाल यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध केला. "आमच्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे. दोषींना कायद्यात बसणारी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे," असे ते म्हणाले.


पोलिसांना मागणी:

या प्रकरणातील तीन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करून, त्यांच्या मागे असणाऱ्या सर्वांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती आणि जाहीर इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.


मोर्चाचा इशारा:

जर त्वरित कारवाई झाली नाही तर 6 तारखेला धुळे शहरातून मोठा मोर्चा काढण्यात येईल, असेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले. प्रशासनाने याची गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


      MJW न्यूज मराठी 

सत्याचा शोध, जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments