Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळ्याच्या SRPF जवानाचा गडचिरोलीत सर्पदंशाने मृत्यू; नक्षलविरोधी मोहिमेत कर्तव्य बजावताना दुर्दैवी घटना

 BREAKING NEWS | गडचिरोली



धुळ्याच्या SRPF जवानाचा गडचिरोलीत सर्पदंशाने मृत्यू; नक्षलविरोधी मोहिमेत कर्तव्य बजावताना दुर्दैवी घटना


धुळे : नक्षलविरोधी मोहिमेसाठी गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेले धुळे येथील SRPF जवान राहुल प्रभाकर शिनगारे (वय ३७) यांचा विषारी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस ठाणे हद्दीतील जंगल परिसरात ते नक्षलविरोधी अभियानावर होते. दरम्यान रेगडी परिसरात अंघोळीसाठी गेले असताना विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


कर्तव्यावर असताना झालेल्या या आकस्मिक निधनाने संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. गडचिरोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.


धुळ्याच्या या वीर सुपुत्राने देशसेवेसाठी आपले प्राण अर्पण केले. MJW न्यूज मराठी परिवाराकडून वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🇮🇳

            

             MJW न्यूज मराठी

           महाराष्ट्र जागरण वार्ता 

गाव ते शहर, बातमी खरी आणि रोखठोक

     सत्याचा शोध, जनतेचा आवाज


#Dhule #Gadchiroli #SRPF #MaharashtraPolice #DhuleNews #GadchiroliNews #MJWNewsMarathi #MaharashtraJagranVarta #भावपूर्णश्रद्धांजली

Post a Comment

0 Comments