Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळे मनपाचा जुना मागील गेट अखेर खुला! भारतीय संविधान सेनेच्या आमरण उपोषणाला यश, उर्वरित मागण्यांसाठी दिला अल्टिमेटम

 धुळे: MJW न्यूज मराठी 



धुळे मनपाचा जुना मागील गेट अखेर खुला! भारतीय संविधान सेनेच्या आमरण उपोषणाला यश, उर्वरित मागण्यांसाठी दिला अल्टिमेटम


धुळे: 

पालकमंत्री श्री. जयकुमार रावल साहेब यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने भारतीय संविधान सेनेने 7 सप्टेंबर 2026 पासून धुळे येथील 'जेल रोड आंदोलन भूमी' वर सुरू केलेल्या आमरण व साखळी उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. 


भारतीय संविधान सेनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने धुळे महानगरपालिकेची जुनी मागील गेट नागरिकांच्या सोयीसाठी खुली केली आहे.


या आमरण उपोषणात संविधान सेनेचे प्रदेश प्रवक्ते संतोष पंढरीनाथ अमृतसागर आणि संविधान सैनिक दावल वाघ हे सहभागी होते. इतर पदाधिकारी साखळी उपोषणात सहभागी झाले होते.


अजूनही प्रलंबित आहेत या 4 मागण्या: 

भारतीय संविधान सेनेचे अध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे यांनी दिलेल्या निवेदनानुसार प्रशासनाने तातडीने या मागण्या पूर्ण कराव्यात:  

1. बाबासाहेब कोतवाल ट्रस्टचे मनपा इमारतीस लागून असलेले 9 मीटर रस्त्यावरील अवैध बांधकाम निष्कासित करणे  

2. जेल रोड आंदोलन भूमीवरील अवाढव्य पत्र्याचे शेड हटवून जागा मोकळी करणे  

3. जुना मुंबई-आग्रा महामार्ग व शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करणे  

4. जेल रोडवर पिण्याचे पाणी व महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे  


प्रशासनाला अल्टिमेटम

या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जेल रोड क्यू्माईन क्लब समोर प्रति शेड उभारून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधान सेनेने दिला आहे.असेही स्पष्ट करण्यात आले.


     MJW न्यूज मराठी 

खऱ्या बातमीचा खरा आवाज

Post a Comment

0 Comments