Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई: 26 लाख 32 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व ट्रक जप्त हरियाणा राज्यातून महाराष्ट्रात अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकला सिमा तपासणी नाक्यावर पकडले

 शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई: 26 लाख 32 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व ट्रक जप्त

हरियाणा राज्यातून महाराष्ट्रात अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकला सिमा तपासणी नाक्यावर पकडले



शिरपूर : MJW न्यूज मराठी 

धुळे: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाला यांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर शिरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी मोठी कारवाई केली आहे. 


पोलीस अधीक्षक डॉ.विशाल आनंद यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार, दि. 18/09/2026 रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिमा तपासणी नाका, हाडाखेड ता.शिरपूर येथे तपासणी करण्यात आली.


यावेळी अशोक लेलँड ट्रक क्रमांक NL-01/AF-1275 मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा, राजनिवास पानमसाला, RMD, V77, राफेल तसेच राजू इलायची सुपारी यांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले.


जप्त केलेला मुद्देमाल:

एकूण ₹26,32,600/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- गुटखा व सुपारी: ₹11,32,800/-

    - RMD पान मसाला - 576 बॉक्स - ₹5,18,400/-

    - राफेल पानमसाला - 1200 पॅकेट्स - ₹1,44,000/-

    - V77 पानमसाला - 2080 पॅकेट्स - ₹2,49,600/-

    - राजू इलायची सुपारी - ₹1,04,400/-

- अशोक लेलँड ट्रक: ₹15,00,000/-


आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल:

ट्रक चालक नाजीर मजिद वय 31 वर्ष, रा. भडास, ता. फिरोजपूर झिरका, जि. नुह, हरियाणा राज्य याला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी श्री.आनंद भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 261/2026 BNS कलम 123, 223, 274, 275 व अन्न सुरक्षा व मानके कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


     MJW न्यूज मराठी

खऱ्या बातमीचा खरा आवाज


#धुळे #शिरपूर #गुटखा #पोलिसकारवाई #MJWNewsMarathi

Post a Comment

0 Comments