Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळे: 2007 पासून मंजूर असलेले मागासवर्गीय वस्तीगृह आजही रखडले, BSP कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 धुळे: 2007 पासून मंजूर असलेले मागासवर्गीय वस्तीगृह आजही रखडले, BSP कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन




 धुळे | 18 सप्टेंबर 2026, MJW न्यूज मराठी

धुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वस्तीगृहाचा प्रश्न गेल्या 19 वर्षांपासून रखडला आहे. 2007 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी साक्री रोड, महिंदळे शिवार, हनुमान टेकडी जवळ वस्तीगृहासाठी 2 हेक्टर जागा मंजूर केली होती. त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद देखील करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत या जागेवर एकही वीट लागलेली नाही.


हा मुद्दा घेऊन बहुजन समाज पार्टी, धुळे जिल्हाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, विशेष समाज कल्याण कार्यालयाकडून या प्रकरणात गांभीर्याने पाठपुरावा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.


विद्यार्थ्यांची काय अडचण?

सध्या धुळे शहरातील माळीवाडा येथील भाड्याच्या इमारतीत वस्तीगृह चालवले जाते. तिथे जागेची कमतरता आहे. लायब्ररी, किचन, जेवणाचा हॉल आणि राहण्याची पुरेशी सोय नाही. परिणामी अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.


बसपाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सिद्धार्थ पारेराव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदनात मागणी केली आहे की, कायदेशीर बाबींची पूर्तता करून तातडीने वस्तीगृहाचे बांधकाम सुरू करावे. जेणेकरून जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा असले वस्तीगृह उपलब्ध होईल.

निवेदनावर भैय्यासाहेब पारेराव यांच्यासोबत राज चव्हाण - खान्देश झोन प्रभारी, प्रा. प्रविण सुर्यवंशी - जिल्हा महासचिव, योगेश जगताप - जिल्हा प्रमारी, संदेश अहिरे - शहर विधानसभा अध्यक्ष,उमेश कडरे,विजय भामरे,जितेंद्र खैरनार, नरेश चिंचोले या सह कार्यकर्ते आदींच्या सह्या आहेत. 


       MJW न्यूज मराठी  

सत्याचा शोध, जनतेचा आवाज


#Dhule #BSP #Vastigruh #Magasvargiya #Education #MJWNewsMarathi

Post a Comment

0 Comments