Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळे: अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी आक्रमक, क्युमाईन क्लब येथे 15 सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू

धुळे: अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी आक्रमक, क्युमाईन क्लब येथे 15 सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू



धुळे | 17 सप्टेंबर 2026, MJW न्यूज मराठी
धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी (भारत एकता मिशन) ने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने 15 सप्टेंबर 2026 पासून धुळे शहरातील क्युमाईन क्लब, जेल रोड येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

8 सप्टेंबर रोजी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील अवैध दारू, जुगार आणि इतर अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती. 

प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई न केल्याने अखेर शांततेच्या मार्गाने साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. उपोषणस्थळी मंडप टाकून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण आणि पंथर राहुल मिनाक्षी वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पत्राची प्रत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे यांनाही देण्यात आली आहे.

     MJW न्यूज मराठी
सत्याचा शोध, जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments