*MJW NEWS • धुळे*
`सत्याचा शोध, जनतेचा आवाज`
अवैध धंद्यांविरोधात एडवोकेट पंकज गोरे यांचा एल्गार सुरू
आंदोलन स्थळी नशेच्या पदार्थांचे प्रदर्शन, प्रशासनाचे वेधले लक्ष
सुप्रसिद्ध वकील एडवोकेट असीम सरोदे यांची विशेष उपस्थिती
*धुळे :* धुळे शहरासह जिल्ह्यात वाढणाऱ्या अवैध धंदे, गुन्हेगारी आणि नशेली पदार्थांच्या विक्रीच्या वाढत्या रॅकेट विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एडवोकेट पंकज गोरे यांनी 27/8/26 पासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एडवोकेट पंकज गोरे यांनी आंदोलन स्थळी नशेच्या पदार्थांचे प्रदर्शन मांडत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. सट्टा मटका, जुगार, अवैध दारू, गांजा, गुटखा, MD ड्रग्स यांसारखे धंदे प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
*असीम सरोदे यांनी दिले सहकार्याचे आश्वासन*
या आंदोलनाला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध वकील एडवोकेट असीम सरोदे धुळ्यात दाखल झाले. त्यांनी आंदोलनाची माहिती जाणून घेतली आणि अवैध धंद्यांविरोधात न्यायालयात जाण्याची वेळ आल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच धुळ्यातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विमल आणि गुटख्याच्या तस्करीबाबत अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून तात्काळ कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*विद्यार्थी ते हॉकर्स पर्यंत सर्वांचा पाठिंबा*
या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, तर तिसऱ्या दिवशी आग्रा रोड हॉकर्स युनियन, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
एडवोकेट पंकज गोरे यांनी इशारा दिला की, प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. धुळे जिल्ह्याला अवैध धंदे व गुन्हेगारी मुक्त करून सुरक्षित-सुंदर धुळे करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी उपस्थित तेजस गोटे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, पंकज भारस्कर, सागर साळवे, दिलीप चित्ते, सूरज भावसार, संदीप चौधरी, कार्तिक पाटील, संजय पाटील, विनोद रनमले, प्रवीण मुर्तडक, मनोज गवळी, बंटी गोरे, आप्पा लहामगे, गोपी सोनार, विशाल ढेकळे, गणेश पाखले, स्वप्नील सोनवणे, सौरभ जवराल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments