Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

पुणे मनपा कनिष्ठ अभियंता भरतीत गैरप्रकार सिद्ध - तरीही नियुक्त्यांची घाई का? विद्यार्थ्यांचा संताप

 *पुणे मनपा कनिष्ठ अभियंता भरतीत गैरप्रकार सिद्ध - तरीही नियुक्त्यांची घाई का? विद्यार्थ्यांचा संताप*



_परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी, आंदोलन तीव्र होण्याचा इशारा_

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचं चौकशी अहवालात सिद्ध झालं आहे. मात्र तरीही प्रशासनाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई सुरू केली आहे. यामुळे परीक्षार्थींमध्ये मोठा संताप आहे.

चौकशीत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून निवड झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतरही सखोल चौकशी करण्यापूर्वीच नियुक्त्या का दिल्या जात आहेत? यामागे कुणाचा दबाव आहे का? असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत.

प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचं म्हणत विद्यार्थी आजही मनपा कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. प्रशासनाने तात्काळ ही परीक्षा आणि दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी त्यांची मुख्य मागणी आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

_वाचा सविस्तर:_ http://www.mjwnews.in.net

_#PuneNews #PMCRecruitment #MPSC #MJWNews_

Post a Comment

0 Comments