Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली डॉ. किरण कुलकर्णी यांची भेट




मराठी चित्रपट सृष्टीच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी महामंडळाची सांस्कृतिक विभागाच्या सचिवांकडे धाव, सकारात्मक चर्चा 


मुंबई, दि. 06 ऑक्टोबर 2026 | MJW न्यूज मराठी


मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीसमोरील विविध अडी-अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे धाव घेतली आहे.


महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले, प्रमुख कार्यवाह श्री. सुशांत शेलार व स्वीकृत संचालिका ॲड. निलम शिर्के-सामंत यांनी आज मा. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.


यावेळी मंत्रालयातील मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन कार्यालयात ही बैठक पार पडली. मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर यावेळी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.


मराठी चित्रपटांना मिळणारे अनुदान, चित्रपटगृहात मराठी चित्रपटांना प्राइम टाईम मिळणे, चित्रिकरण परवानग्या आणि इतर धोरणात्मक विषयांवर या निवेदनात लक्ष वेधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी निवेदनाचा सकारात्मक विचार करून लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिले.


       MJW न्यूज मराठी 

सत्याचा शोध, जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments