Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

साक्रीत जेवणाच्या वादातून मित्राची हत्या; दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात!

 साक्रीत जेवणाच्या वादातून मित्राची हत्या; दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात!



धुळे | साक्री | दिघावे गाव | MJW न्यूज मराठी  

`15 सप्टेंबर 2026`


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावात जेवणावरून झालेल्या वादातून एका मित्राची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


घटनेची माहिती  

मिळालेल्या माहितीनुसार, दिघावे येथील चैत्राम दिलीप माळीच वय 40 वर्ष हे सोमवारी आपले मित्र प्रकाश सुभाष सोनवणे आणि रोहिदास रामचंद्र जाधव यांच्यासोबत शेतातील नाल्याकाठी बसून जेवत होते. जेवताना तिन्ही मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.


वादाचे पर्यवसान भांडणात झाले. रागाच्या भरात प्रकाश सोनवणे आणि रोहिदास जाधव यांनी चैत्राम यांच्यावर कुन्हाडी आणि दांडक्याने डोक्यावर वार केले. या हल्ल्यात चैत्राम हे जागीच बेशुद्ध होऊन पडले.


पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चैत्राम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी साक्री पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रकाश सुभाष सोनवणे आणि रोहिदास रामचंद्र जाधव या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत.


गावात खळबळ

या घटनेमुळे दिघावे गावात एकच खळबळ उडाली आहे. जेवणाच्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


MJW न्यूज मराठी |सत्याचा शोध, जनतेचा आवाज|

Post a Comment

0 Comments