Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

इगतपुरीच्या शेतकऱ्यांच्या तांदळातील मिक्सिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 इगतपुरीच्या शेतकऱ्यांच्या तांदळातील मिक्सिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर



इगतपुरी | MJW न्यूज मराठी

इगतपुरी-घोटीच्या तांदळाच्या नावाने होणाऱ्या कथित मिक्सिंग आणि विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात स्थानिक शेतकरी _विनोद नाठे_ यांनी प्रशासनाला आणि मंत्री महोदयांना थेट सवाल केला आहे.


शेतकरी विनोद नाठे म्हणाले, "मोबाईल का घेतला? शूटिंगसाठी परवानगी का घ्यावी?" मंत्री महोदयांशी चर्चा करत असताना आपली शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.


नाठे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी त्यांनी अनेक निवेदने दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. इगतपुरी-घोटीच्या तांदळाला बाजारात असलेले नाव आणि विश्वास याचा गैरफायदा घेऊन मिक्सिंग करून विक्री होत असल्याचा त्यांचा दावा आहे.


शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी तसेच अन्नधान्याच्या गुणवत्तेसाठी तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.


_MJW न्यूज मराठी - सत्याचा शोध, जनतेचा आवाज_

Post a Comment

0 Comments