Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत आयकर भवन परिसरात वृक्षारोपण संपन्न

 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत आयकर भवन परिसरात वृक्षारोपण संपन्न




धुळे | 27 सप्टेंबर 2026, MJW न्यूज मराठी


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 'एक पेड माँ के नाम' या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत धुळे शहरातील साक्री रोडवरील आयकर भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देत आयकर विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी आयकर भवन परिसरात विविध प्रकारच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण नव्हे, तर लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे जतन करणे काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती:

प्रभाग क्र. ७ च्या नगरसेविका वंदनाताई संजय भामरे

सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा भामरे

शिक्षक संघटनेचे चंद्रकांत बाविस्कर सर

अतिरिक्त आयकर आयुक्त हर्षित बारी

आयकर अधिकारी नमो नारायण मीना

आयकर निरीक्षक नागेंद्र यादव

कार्यालय अधीक्षक राहुल अहिरे, मनीष कुशवाह

कर सहाय्यक नरेश मीना यांच्यासह आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'एक पेड माँ के नाम' या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासोबतच वृक्षलागवड ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.


MJW न्यूज मराठी - सत्याचा शोध, जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments