खार पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: दोन घरफोडीचे गुन्हे उघड, 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई | प्रतिनिधी
दि. 24 सप्टेंबर 2026
खार पोलीस ठाणे हद्दीत 23 सप्टेंबर 2026 रोजी दाखल झालेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात खार पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. आरोपीस अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
खार पोलीस ठाण्यात दिनांक 23/09/2026 रोजी CR No. 1590/2026 व CR No. 1592/2026 अंतर्गत BNS कलम 331(3), 305 प्रमाणे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल होते.
गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो.उप.नि. शैलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळावरील CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली.
आरोपी अटकेत
तपासात नवाज रमजान शेख, वय 21 वर्षे, रा. खार (प.), मुंबई हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.
2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपीकडून चोरीला गेलेले एकूण 07 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹2,02,500/- इतकी आहे. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस पथकाचे कौतुक
ही संपूर्ण कारवाई मा. संतोष काटे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे प्रकटीकरण पथक:
पो.उप.नि. शैलेश चौधरी
पो.ह.क्र. 010568/कांबळे
पो.ह.क्र. 040530/निकम
पो.शि.क्र. 113159/कांबळे
पो.शि.क्र. 113170/कदम
पो.शि.क्र. 141186/खेडकर
पो.शि.क्र. 150652/चव्हाण
MJW न्यूज मराठी
"सत्याचा शोध, जनतेचा आवाज"



Post a Comment
0 Comments