प्रभाग क्रमांक ८ मध्ये सत्यसाई बाबा सोसायटी येथे काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
*धुळे, 5 सप्टेंबर 2026* | MJW न्यूज मराठी| : प्रभाग क्रमांक ८ मधील सत्यसाई बाबा सोसायटी येथे काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले.
परिसरातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासोबतच धुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विकासकामांना सातत्याने गती दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक ८ सह संपूर्ण धुळे शहराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास हेच ध्येय असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.
*उपस्थित मान्यवर:*
धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती सौ. लताताई पोतदार, नगरसेवक निलेश नेमाने, नगरसेविका प्रियंका खंडू बोरसे, प्रवीण अग्रवाल, कामाचे सूचक योगेश आप्पा ईशी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रत्यक्ष विकासकामे हाच संकल्प असल्याचे आयोजकांनी सांगितले.
_- MJW न्यूज मराठी_
_सत्याचा शोध, जनतेचा आवाज | http://www.mjwnews.in.net_
#Dhule #Prabhag8 #Vikas #MJWNewsMarathi


Post a Comment
0 Comments