*धुळ्यात ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ फोडत प्रशासनाचे वेधले लक्ष; महिला दहीहंडीला सामाजिक संदेशाची जोड*
*धुळे :* शहरातील भगवा चौक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक उत्सवाला यंदा सामाजिक विषयाची जोड देत ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ हा उपक्रम राबवून बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी अवैध धंद्यांविरोधात जनजागृती केली.
दहीहंडी म्हणजे उत्साह आणि जल्लोष. मात्र यंदा भगवा चौकात केवळ मनोरंजनापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता समाजातील ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. शहरातील वाढते अवैध धंदे, त्याचा तरुणाईवर होणारा परिणाम आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ उभारून ती फोडण्यात आली.
*विद्यार्थिनींच्या सहभागाने रंगत*
बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी दहीहंडीच्या गाण्यांवर आणि आदिवासी गीतांवर नृत्य सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला. दहीहंडी फोडताना विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह दिसून आला. यावेळी विद्यार्थिनींना प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा पगार, मनीषा साळवे, अर्चना गोरे आणि सोनल गोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
*आंदोलनाची पार्श्वभूमी*
हा उपक्रम 8-9 दिवसांच्या आंदोलनानंतर करण्यात आला. धुळे शहर व जिल्ह्यातील कथित अवैध धंद्यांविरोधात एड. पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. प्रशासनाने मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सामाजिक जनजागृती सुरू ठेवण्यासाठी दहीहंडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा संदेश देण्यात आला.
*उपस्थित मान्यवर*
या कार्यक्रमाला भगवा चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष पंकज भारस्कर, प्रवीण मुर्तडक, विनोद रणमळे, आप्पा लहामगे, योगेश गोरे, सागर निकम, मयूर कुलकर्णी, निलेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पंकज भारस्कर, सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर तर आभार प्रदर्शन धनंजय दीक्षित यांनी केले.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, उत्सव साजरा करताच समाजातील चुकीच्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठविता येतो, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
*📍 धुळे*
*सत्याचा शोध, जनतेचा आवाज | http://www.mjwnews.in.net*
#Dhule #MJWNewsMarathi



Post a Comment
0 Comments