Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

खार पोलिसांची जलद कारवाई! गणपती विसर्जनाच्या गर्दीत चोरलेली 3.66 लाखांची मालमत्ता 24 तासात हस्तगत

 खार पोलिसांची जलद कारवाई! गणपती विसर्जनाच्या गर्दीत चोरलेली 3.66 लाखांची मालमत्ता 24 तासात हस्तगत




मुंबई, खार: 

खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरी झालेली 100% मालमत्ता हस्तगत केली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


घटना काय घडली?

दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी सायं. 18.30 ते 19.00 वाजण्याच्या दरम्यान खार दांडा, खार पश्चिम येथील जेट्टीवर गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने विरार पूर्व, पालघर येथील रहिवासी मानसी महेंद्र चिले वय 43 यांची बॅग रिक्षातून लांबवली.


या बॅगेमध्ये 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत ₹3,60,000/-, रोख ₹2,500/- आणि कपडे ₹4,000/- असा एकूण ₹3,66,500/-चा ऐवज होता. या प्रकरणी 20/09/2026 रोजी खार पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 1578/2026 कलम 303(2) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांची धडक कारवाई

गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला गती दिली. घटनास्थळावरील CCTV फुटेज चे बारकाईने विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी शैलेंद्रकुमार दीनानाथ कश्यप, रा. खळा मैदान, खार दांडा याला ताब्यात घेतले.


चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण मालमत्ता म्हणजेच 100% ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.


अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

या कारवाईसाठी मा. डॉ. मोहितकुमार गर्ग सर, पोलीस उप. आयुक्त, पश्चिम परिमंडल 2, मा. अधिकराव पोळ सर, सहा. पोलीस आयुक्त, बांद्रा विभाग आणि मा. संतोष काटे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खार पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन लाभले.


तपास पथक

ही यशस्वी कारवाई पो.उप.नि शैलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पो.ह. कांबळे, निकम, पो.शि. सावंत, लहामागे, कांबळे, कदम, खेडकर, चव्हाण यांनी केली. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.


        MJW न्यूज मराठी 

"सत्याचा शोध, जनतेचा आवाज"

Post a Comment

0 Comments