Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

MSRTC चा मोठा दिलासा! ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC सवलतीला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ

 MSRTC चा मोठा दिलासा! ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC सवलतीला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ



मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTC ने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

ज्यांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे मात्र कार्ड अद्याप मिळालेले नाही, अशा प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे. MSRTC ने NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे.

मूळ नियोजनानुसार 1 सप्टेंबर 2026 पासून सवलतीसाठी NCMC कार्ड बंधनकारक होणार होते. मात्र कार्ड निर्मितीला विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने ही मुदत *30 सप्टेंबर 2026* पर्यंत वाढवून दिली आहे.

महत्त्वाचे:

30 सप्टेंबर 2026 पर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना कार्ड नसेल तरी चालेल. फक्त नोंदणीची पावती दाखवल्यानंतर त्यांना तिकीटावरील सवलतीचा लाभ मिळणार आहे.

या निर्णयामुळे हजारो ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

---

*सत्याचा शोध, जनतेचा आवाज | http://www.mjwnews.in.net*

Post a Comment

0 Comments