Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

धुळ्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना; ₹2,452 कोटींच्या करारांतून 3,500 रोजगारांची संधी

 धुळ्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना; ₹2,452 कोटींच्या करारांतून 3,500 रोजगारांची संधी



धुळे: धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 मध्ये तब्बल ₹2,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 60 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यातून जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार युवकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.


उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी धुळ्याला राज्याच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे पुढे आणण्याची ग्वाही दिली. त्यांनी जमीन, वीज, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले.


यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, "धुळे हे महाराष्ट्राचे औद्योगिक प्रवेशद्वार आहे. पुढील 25 ते 30 वर्षांचा औद्योगिक रोडमॅप तयार करून रावेर एमआयडीसी, नरडाणा ग्रोथ सेंटर आणि लॉजिस्टिक पार्कला गती देऊ."


कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक?

- 29 करार - अभियांत्रिकी उद्योग

- 14 करार - कृषी व अन्नप्रक्रिया

- 2 करार - वस्त्रोद्योग

- 15 करार - विविध क्षेत्र


त्यामुळे धुळ्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसोबतच स्थानिक युवकांसाठी उद्योग आणि कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.


सत्याचा शोध, जनतेचा आवाज | http://www.mjwnews.in.net

Post a Comment

0 Comments