Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा; पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे धुळेकरांना आवाहन

 गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा; पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे धुळेकरांना आवाहन



MJW न्यूज मराठी

धुळे, 13 सप्टेंबर 2026: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धुळेकर जनतेला शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.


धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातून बोलताना विशाल आनंद म्हणाले की, "गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे. हा सण आनंदाचा, एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा प्रतीक आहे. प्रत्येकाने हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा, मात्र त्याचबरोबर जबाबदारीने वागावे."


ते पुढे म्हणाले की, "धुळे पोलीस प्रशासन गणेशोत्सवाच्या काळात चोख बंदोबस्त ठेवणार आहे. कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद बाबतीत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा."


SP विशाल आनंद यांनी तरुणांना विशेष आवाहन करताना सांगितले की, डीजे, मिरवणूक आणि विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण आणि वाहतुकीचे नियम पाळावेत. कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद टाळून एकोप्याने सण साजरा करावा.


#Dhule #Ganeshotsav2026 #VishalAnand #DhulePolice #MJWNewsMarathi

Post a Comment

0 Comments