Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

पुण्यात रात्री 1 वाजता रीलस्टार संतोष पंडित यांना पोलिसांनी घरातून घेतले ताब्यात

 पुण्यात रात्री 1 वाजता रीलस्टार संतोष पंडित यांना पोलिसांनी घरातून घेतले ताब्यात



पुणे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप असलेल्या रीलस्टार संतोष पंडित यांना काल रात्री 1 वाजता पुण्यातील त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले.


या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात संतोष पंडितांसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. संतोष पंडित यांच्या समर्थकांनी `#santoshpandit` आणि `#santoshpanditfans` या हॅशटॅगसह "प्रश्न विचारणं गुन्हा कधीपासून झाला?" असा सवाल उपस्थित केला आहे.


समर्थकांचा सूर

santoshpanditfan या फॅन पेजवरून पोस्ट करण्यात आली आहे,

"सामान्य माणूस म्हणून प्रश्न विचारला, आणि त्याची किंमत रात्री अटक होऊन मोजावी लागली...

चूक झाली असेल तर कायद्याने कारवाई करा, पण प्रश्न विचारणं हा गुन्हा कधीपासून झाला?"

अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यावर नेटकरी चर्चा करत आहेत.

दरम्यान, डेक्कन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments