*खासगी वाहनांवर ‘पोलिस’ पाटी लावल्यास थेट फौजदारी कारवाई*
मुंबई: स्वतःच्या खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर रुबाब दाखवण्यासाठी ‘पोलिस’ अशी लाल रंगाची पाटी लावणे आता महागात पडणार आहे.
खासगी वाहनांवर अशा पाट्या लावल्याने अवैध धंदे आणि दहशत निर्माण होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत अपर पोलिस महासंचालक वाहतूक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक आणि आयुक्तांना कारवाईचे कडक आदेश दिले आहेत.
यापुढे अशा वाहनांवर थेट मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. पोलिस विभागाने यासंदर्भात सर्व पोलिस स्टेशनला पत्र पाठवले आहे.


Post a Comment
0 Comments