*धुळेकरांच्या आरोग्यसेवेला मिळाली नवी ताकद! जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि MRI युनिटचे लोकार्पण*
*धुळे:* जिल्हाकरांच्या आरोग्यसेवेसाठी आज ऐतिहासिक दिवस ठरला. जिल्हा रुग्णालय, धुळे येथे १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय तसेच अत्याधुनिक MRI युनिटचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्यमंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन मंत्री मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
आतापर्यंत धुळेकर नागरिकांना उपचारासाठी चक्करबर्डी येथे जावे लागत होते. तसेच MRI तपासणीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोठा खर्च करावा लागत होता. आता जिल्हा रुग्णालयातच ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे १०० खाटांचे हे रुग्णालय २०० खाटांचे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ही सुविधा वाढविण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाषबाबा भामरे, धुळे शहरचे आमदार श्री. अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार श्री. राम दादा भदाणे, महापौर सौ. मायादेवी परदेशी, जिल्हाधिकारी सौ. भाग्यश्री विसपुते, डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्रजी सोनवणे यांच्यासह प्रमुख मान्यवर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळेकरांसाठी सक्षम, सुलभ आणि आधुनिक आरोग्यसेवा उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
#धुळे #धुळेकर #जिल्हारुग्णालय #महिलावबालरुग्णालय #MRI #MJWNews


Post a Comment
0 Comments