Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

साखर 80 रुपये किलो! सणासुदीच्या तोंडावर महागाईचा मोठा फटका

 *साखर 80 रुपये किलो! सणासुदीच्या तोंडावर महागाईचा मोठा फटका*



धुळे/मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसली आहे. साखरेच्या दरात पुन्हा एकदा ऐतिहासिक वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखर 80 रुपये किलोला विकली जात आहे.


घाऊक बाजारात साखरेचे दर 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.


गणेशोत्सव आणि दिवाळी जवळ आल्याने गोड पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र वाढत्या दरांमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.


व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्पादनात घट आणि निर्यात वाढल्याने देशांतर्गत पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.


साखरेच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments