*धुळे:* धुळे शहरातील अनधिकृत मटण-चिकन विक्री केंद्रे, अंडी-चिकन गाड्या आणि अस्वच्छ पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
देवपूर परिसरासह शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवावी. महापालिका परवाना व FSSAI नोंदणीची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे धुळे महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कायदेशीर बाबींचे पालन होणे गरजेचे आहे, असे हिंदू युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
#MJWNews #Dhule #DhuleMunicipalCorporation #MarathiNews


Post a Comment
0 Comments