*`धुळ्यात धावणार 'राजमाता जिजाऊ' बसेस, महापौरांच्या हस्ते लोकार्पण`*
*धुळे:*
धुळे विभागातील सार्वजनिक वाहतूक सेवेला नवे बळ मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने धुळे आगार येथे नव्याने दाखल झालेल्या *‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे* लोकार्पण आज महापौर सौ. मायाताई परदेशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विभाग नियंत्रक श्री. पुरुषोत्तम व्यवहारे आणि वरिष्ठ आगार प्रमुख श्री. संदीप निकम हे देखील उपस्थित होते.
*आधुनिक आणि सुरक्षित प्रवास*
धुळे जिल्ह्यातील विविध मार्गांवर या आधुनिक, सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी बसेस धावणार आहेत. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या प्रवासाला अधिक गती, सुविधा आणि विश्वासार्हता मिळणार आहे.
सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
या उपक्रमामुळे *विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना* सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे धुळे विभागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक श्री. महादेव परदेशी, नगरसेविका सौ. चित्रलेखा परदेशी, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. दिलीप बंजारा, विभागीय सुरक्षा दक्षता अधिकारी श्री. दिपक धात्रक, श्री. मनोज पवार, श्री. रवींद्र मोरे, श्री. संजय अवस्ती तसेच अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MJW न्यूज
_सत्याचा शोध, जनतेचा आवाज_
`#MSRTC #MSRTCofficial #dhule #RajmataJijauBus #MJWNewsMarathi`


Post a Comment
0 Comments