जरांगे पाटलांचा 'गनिमी कावा' - गुपचूप मुंबई गाठण्याचे आदेश
जालना :
मराठा आरक्षणाच्या 58 लाख कुणबी नोंदींच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस झाला असून या उपोषणाकडे अद्याप सरकारने कोणतीही अधिकृत दखल घेतलेली नाही. चर्चेसाठी सरकारकडून संपर्कही साधण्यात आलेला नाही.
सरकारच्या या उदासीनतेमुळे आक्रमक झालेल्या जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मोठे आदेश दिले आहेत. आगामी मुंबई आंदोलनासाठी "गनिमी कावा" वापरण्याची रणनीती आखण्यास सांगितले आहे.
"गाड्यांवर झेंडे न लावता आतापासूनच गुपचूप मुंबई गाठायला सुरुवात करा," असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि 58 लाख कुणबी नोंदींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकडे कूच करण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
#MarathaReservation #ManojJarangePatil #AntarwaliSarati #MJWNews


Post a Comment
0 Comments