Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

प्रा. चंद्रप्रभा निकम यांना पीएच.डी. प्रदान

 *प्रा. चंद्रप्रभा निकम यांना पीएच.डी. प्रदान*


नाशिक : प्रतिनिधी

यशवंत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका *डॉ. चंद्रप्रभा त्र्यंबक निकम* यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.


कोरोना महामारीदरम्यान आशा सेविकांच्या कार्याचा समाजकार्य दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनासाठी त्यांना ही पदवी जाहीर झाली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय होता -  

*"कोरोना महामारीदरम्यान आशा वर्कर्सच्या कार्याचा समाजकार्य दृष्टिकोनातून अभ्यास : विशेष संदर्भ नाशिक जिल्हा"*


कोविड काळात आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या आशा वर्कर्सना आलेल्या आव्हानांचा, अडचणींचा आणि त्यांच्या योगदानाचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीचा विशेष संदर्भ घेऊन केलेल्या या संशोधनाला मार्गदर्शक म्हणून डॉ.श्याम दामू सोनवणे यांनी सहकार्य केले.


या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी डॉ. निकम यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments