Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

युवासेनेचे अवैध धंद्यांविरोधात आंदोलन, अ‍ॅड. पंकज गोरेंचा आमरण उपोषणाचा इशारा

 *धुळे: युवासेनेचे अवैध धंद्यांविरोधात आंदोलन, अ‍ॅड. पंकज गोरेंचा आमरण उपोषणाचा इशारा*







*धुळे | MJW न्यूज मराठी*  

धुळे शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारी वाढल्याने शिवसेना उबाठा युवासेनेने आजपासून आंदोलन सुरू केले आहे. युवासेनेचे राज्य सहसचिव अ‍ॅड. पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.


प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात ठोस कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करून आमरण उपोषण करण्याचा इशारा अ‍ॅड. गोरे यांनी दिला आहे.


*युवासेनेच्या 3 प्रमुख मागण्या:*

1. *अवैध धंदे तात्काळ बंद करा* - सट्टा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गांजा, गुटखा यांच्यावर कठोर कारवाई करावी

2. *कष्टकऱ्यांना संरक्षण द्या* - टपरी आणि रोडगाडीधारकांवर सरसकट कारवाई करू नये. जप्त केलेले साहित्य कोणताही दंड न आकारता परत करावे  

3. *विशेष पथक स्थापन करा* - वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमून गुन्हेगारांवर कारवाई करावी

अ‍ॅड. गोरे म्हणाले, "अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करा. मात्र कष्टाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांचा रोजगार हिरावून घेऊ नका."


*प्रशासनाला इशारा*

आंदोलनादरम्यान युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून आमरण उपोषण केले जाईल.

आंदोलनात जिल्हाप्रमुख शाना भाऊ सोनवणे, तेजस गोटे, तारका बिरोकर, पंकज भारसकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 #DhuleNews #YuvaSena #PankajGore #AvaidhDhande #MJWNews

Post a Comment

0 Comments