Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

अवैध मटका-जुगाराविरोधात युवासेनेचे रान, आंदोलनाचा दुसरा दिवस

 *धुळे: अवैध मटका-जुगाराविरोधात युवासेनेचे रान, आंदोलनाचा दुसरा दिवस*






*धुळे | MJW न्यूज मराठी*  

धुळे जिल्ह्यातील अवैध मटका, जुगार आणि इतर गुन्हेगारी धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी युवासेनेने पेटवलेले आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.


27 तारखेपासून `धुळे जिल्हा गुन्हामुक्त करा!` या मागणीसाठी तंबू टाकून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी अवैध धंद्यांमधून जप्त केलेल्या *मटक्याच्या पावत्या, ताशाचे पत्ते आणि रोख रक्कम* सार्वजनिकरित्या दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधले.


युवासेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


#DhuleNews #YuvaSena #IllegalBusiness #Matka #GunjamuktDhule #MJWNews

Post a Comment

0 Comments