Type Here to Get Search Results !

MJW News

MJW News

*घरकुल यादी 2024: नाव नसेल तर काय करायचं? BDO रामकांत माळी यांचे 3 महत्वाचे निर्देश*

 


*अकोट:* प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 च्या सर्वेक्षणाच्या याद्या अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत पंचायत समिती अकोटचे BDO रामकांत माळी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.


BDO माळी यांनी सांगितले की, यादीबाबत नागरिकांच्या मनात 3 प्रकारच्या शंका आहेत.


*पहिली बाब - यादीत नाव आहे पण माहिती चुकीची आहे* 

असे लाभार्थी ग्रामसभेत उपस्थित राहून "Fact Change" साठी अर्ज करू शकतात. ग्रामसेवक त्यांची ऑनलाइन नोंद करतील.


*दुसरी बाब - सर्वे केला पण नाव आले नाही*

हे प्रकरण ग्रामसेवकाने reject केलेले नसून AI सिस्टमने आपोआप reject केले आहे. अशा पात्र लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय Appellate Committee कडे Appeal दाखल करावी.


*तिसरी बाब - सर्वेच झाला नाही*

जे पात्र आहेत पण सर्वेक्षणाच्या वेळी बाहेरगावी होते किंवा माहिती मिळाली नाही, त्यांची स्वतंत्र यादी ग्रामपंचायत स्तरावर तयार केली जाईल. ही यादी वरिष्ठ कार्यालयाकडे आणि PMAY ला पाठवली जाईल.

सध्या सर्व ग्रामपंचायतींना याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्या ग्रामसभेसमोर वाचून अंतिम केल्या जातील, असेही BDO माळी यांनी स्पष्ट केले.


#ग्रामसभा #घरकुल #PMAY #BDO #रामकांतमाळी #MJWन्यूज #अकोट

Post a Comment

0 Comments